पालिकेसमोरच नियमांची पायमल्ली, इतरत्र काय? ना मास्क,ना सोशल डिस्टन्सिंंग ः आयुक्‍तांची कारवाई

Foto
लॉकडाउनच्या चार टप्प्यांनंतर बाजारपेठा खुल्या करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. त्यानंतर दुकानात येणार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेने व्यापार्‍यांना ऑक्सिमीटर व थर्मलगन ठेवणे बंधनकारक केले होते. ही यंत्रसामग्री खरेदीसाठी 14 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.या अनुषंगाने आज (दि.9) प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी महानगरपालिकेसमोरील सर्व दुकाने, हॉटेल याठिकाणी जाऊन पाहणी करत कडक कारवाई केली. 
आज सकाळी कार्यालयात येताना महानगरपालिकेचे प्रशासक  आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कार्यलयाच्या बाहेरच उतरून महानगरपालिके समोरील दुकाने, हॉटेल टपर्‍या इत्यादी ची पाहणी केली. यातील बहुतांश ठिकाणी ऑक्सिमीटर, थर्मलगन नव्हते तसेच याठिकाणी सोशल डिस्टन्सिंंग देखील पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले.
व्यापारी-ग्राहक विनामास्क फिरत होते. येथील 4 दुकानांना दंड लावण्याचे आदेश यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिले. या सर्व व्यापार्‍यांवर कारवाई करुन दुकाने बंद करण्यात आली. थर्मलगनच्या माध्यमातून एखाद्याला ताप आहे का याची, तर ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व पल्सरेटची तपासणी होते. सुरुवातीला व्यापार्‍यांनी सम-विषमसह यंत्रसामग्रीसाठी विरोध केला होता. आयुक्तांनी व्यापार्‍यांना 14 जूनपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर दुकानांची तपासणी करून नियम न पाळणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला होता